इराण- इस्रायल युद्धामुळे वाढली सोन्याची चमक, काय आहेत दर ?

सोन्याच्या दरात सुरू असलेली वाढ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळेच गुंतवणूकदारांना त्यातून चांगला नफा मिळत आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदाच बाजार उघडला तेव्हा सोन्याच्या दरात जोरदार वाढ दिसून आली. 2024 मध्ये आतापर्यंत मिळालेल्या रिटर्न्सबद्दल बोललो तर ते 15% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच गेल्या तीन महिन्यांत सोन्याने एफडीपेक्षा दुप्पट परतावा दिला आहे.