इर्शाळवाडी! मृतांचा आकडा २२ वर, ११० नागरिकांची ओळख पटली

मुंबई : इर्शाळवाडीचा दुसरा दिवसही विषण्ण मनस्थितीत उगवला. ४० तासांच्या शोधकार्यानंतर काल सायंकाळपर्यंत सहा मृतदेह बचावपथकाच्या हाती लागले असून, मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११० नागरिकांची ओळख पटली आहे. अजूनही ७० ते ८० नागरिकांचा शोध लागलेला नाही.

दरम्यान, राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

बचावलेल्या नागरिकांशी ठाकरेंचा संवाद
खालापूरच्या इर्शाळवाडी येथे दुर्घटनास्थळी माजी उद्धव ठाकरे पोहचले असून खालापूरचा नजाळ पंचायतीमध्ये त्यांनी दुर्घटनाग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब, अंबादास दानवे देखील आहेत. थोड्याच वेळात ते इर्शाळवाडी येथील दुर्घटना घडली त्या ठिकाणाची देखील पाहणी करणार आहेत.