तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यात चाललेल्या या युद्धाचा परिणाम अन्य देशासह भारतावरही दिसून येत आहे. तसेच या युद्धामध्ये इराण आणि लेबनॉनसारखे देश यांचा समावेश राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इस्त्रायल आणि हमास युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते. यासोबतच सोने चांदीचे भावही वाढले आहेत. कच्च्या तेलावर अवलंबून असलेल्या उत्पादनांच्या किमती वाढू शकतात. कच्च्या पुरवठ्यावर जर परिणाम झाला तर प्लास्टिक आणि इतर वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तूमधील स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशिन आणि इतर जीवनावश्यक वस्तूमध्ये वाढ होऊ शकते.
इस्त्रायल आणि हमास युद्धाचा परिणाम हा जीवनावश्यक वस्तूंवर दिसेल. FMCG क्षेत्रातील वस्तू महागण्याची शक्यता आहे. सणासुदीला भारतीय बाजारपेठेत या गोष्टींचा तुडवडा जाणवणार नाही. त्यामुळे किमती काही प्रमाणात स्थिर राहातील. कच्च्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास प्लास्टिक आणि इतर वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात.