इस्रायल-हमास युद्धादरम्यान, अमेरिकन सैन्याने आज सकाळी पूर्व सीरियातील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित दोन ठिकाणांवर हवाई हल्ले केले. याआधी गेल्या आठवड्यात सीरियामध्ये अमेरिकन सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि रॉकेट हल्ला झाला होता. त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने ही कारवाई केली.
पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, १७ ऑक्टोबरपासून इराकमधील अमेरिकन सैन्य ठिकाणांवर किमान १२ आणि सीरियामध्ये ४ हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे २१ सैनिक जखमी झाले होते. त्यामुळे अमेरिकेने पूर्व सीरियातील इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डशी संबंधित ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
इराण समर्थित मिलिशिया गटांनी १७ ऑक्टोबर रोजी इराक आणि सीरियामध्ये अमेरिकन सैन्यावर हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. इराणवर लेबनान, सीरिया आणि इराकमध्ये मिलिशिया गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला जातो. इराण या दहशतवादी संघटनांचा वापर मध्य-पूर्वमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी करतो.