---Advertisement---

इस्रोमध्ये 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; दरमहा 69000 पगार मिळेल

---Advertisement---

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी चांगली बातमी आहे. फक्त 12 वी पास असलेल्यांसाठी इस्रोमध्ये भरती निघाली आहे. ISRO ने तंत्रज्ञ-B पदांच्या भरतीसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. याभरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबरपासून सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे.

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 54 पदे भरली जातील. त्यामुळे मुदतीपूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

काय आहे पात्रता ?
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असावी. त्यानंतरच ते अर्ज करण्यास पात्र मानले जातील. उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेच्या ITI प्रमाणपत्रासह इयत्ता 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.

परीक्षा फी :
अर्ज करण्यासाठी, तुम्हाला अर्जाची फी भरावी लागेल. अर्जाची फी ₹ 100 आहे. तथापि, सुरुवातीला सर्व उमेदवारांना प्रक्रिया शुल्क म्हणून प्रति अर्ज ₹ 500 ची एकसमान रक्कम भरावी लागेल.

अर्ज कसा करायचा?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक उमेदवार ISRO च्या अधिकृत वेबसाइट isro.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ISRO च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीतील कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---