उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : काही तासांत सुरू होईल मॅन्युअल ड्रिलिंग, पंतप्रधानांचे प्रधान सचिव घटनास्थळी

उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस बचावकार्य सुरू आहे. यात विविध अडचणींमुळे बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास विलंब होत आहे. अमेरिकेतून आलेल्या औगर मशिनशिवाय देशातील विविध राज्यांतील मशिनही निकामी झाल्या आहेत. कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागतील, असे सांगण्यात येत आहे. सध्या मदत पथक उभ्या ड्रिलिंग करत आहे.

आतापर्यंत 19.2 मीटरचे उभ्या खोदकाम पूर्ण झाले आहे. आत अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी 86 ते 87 मीटर ड्रिल करावे लागणार आहे. यासाठी बचाव कार्यात सहभागी असलेल्या यंत्रणांनी 100 तासांचे लक्ष्य ठेवले आहे. म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलद्वारे यश मिळणे अपेक्षित आहे. संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन टीम कामगारांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे.