उद्धव ठाकरेंचा आणखी एक आमदार रडारवर; ACB ची टीम चौकशीसाठी घरी पोहचली

मुंबई । आमदार रवींद्र वायकर यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचे आणखी एक आमदार रडारवर आले आहेत. शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. रत्नागिरी आणि रायगड कार्यालयातील अधिकारी आले आहेत. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरु केली आहे.

एसीबीच्या पथकाकडून राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी झाडाझडती सुरू असून एकाच वेळी 3 ठिकाधी कारवाई झाल्याने 3 पथके असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तर राजन साळवी यांचे बंधू यांनी सीएम ऑफीस मधून त्यांना ऑर्डर आल्यानेते कारवाई करत असल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले आमदार साळवी
चौकशीचे परिणाम काय होऊ द्या, सामोर जाण्याची माझी तयारी आहे. माझ्या पक्षावर पुन्हा विश्वास आहे. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्यामुळे आमची चौकशी सुरु झाली आहे. आम्ही कसे आहोत, हे जनतेला माहीत आहे. माझ्या पाठिशी माझे मतदार आणि संपूर्ण जिल्हा आहे. मी कारागृहात गेलो तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असे राजन साळवी यांनी सांगितले.