---Advertisement---

उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत ट्रेनमधील प्रवासावर भाजपने लगावला टोला, म्हणाले ‘लाभार्थी..’

---Advertisement---

वंदे भारत एक्सप्रेस हा नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. भाजपने उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत यात्रेचे दोन फोटो ट्विट केले आहेत. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. दुसऱ्या छायाचित्रात उद्धव ठाकरेंसोबत विनायक राऊत दिसत आहेत. मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी असल्याचे भाजपने म्हटले आहे. वंदे भारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसऱ्यांदा… मोदी सरकार!

उद्धव ठाकरे ४ आणि ५ फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर होते. कोकणात झालेल्या सभांमधून उद्धव ठाकरे यांनीही मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारकडून विकास होत नसल्याची टीका त्यांनी आपल्या भाषणात केली. यानंतर उद्धव ठाकरे सायंकाळी खेड स्थानकातून वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चढले आणि खेड ते मुंबई असा वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला. त्यांच्या दौऱ्याचे छायाचित्र शेअर करताना महाराष्ट्र भाजपने खिल्ली उडवली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment