---Advertisement---

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का ; उत्तर महाराष्ट्रातील आमदार फुटला, आज शिंदे गटात प्रवेश करणार

---Advertisement---

नंदुरबार । एकीकडे लोकसभा निवडणुकींचे बिगुल वाजले असतानाच शिवसेना ठाकरे गटाची गळती सुरूच असून याच दरम्यान आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला. नंदुरबार जिल्ह्यातील ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी हे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा म्हणून आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे पाहिलं जाते. मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आमदार आमश्या पाडवी यांच्यासोबत नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके तसेच जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक मोठे चेहरे हे शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.

महाविकास आघाडीमध्ये नंदुरबार लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार आमच्या पाडवी हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी नंदुरबार लोकसभेसाठी तिकिटाची मागणी केली होती. परंतु तिकीट न मिळाल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आता लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या वतीने आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment