उद्धव ठाकरे हे विसरले असतील तर…; बावनकुळेंनी केला बाळासाहेबांचा तो Video ट्वीट

मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईमध्ये समारोप होणार असून त्याआधी खासदार राहुल गांधी हे शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करणार असल्याचे सांगण्यात येत यावरून बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय

ट्विटमध्ये नेमके काय म्हणालेत चंद्रशेखर बावनकुळे?
“शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली,”


‘‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,‘‘ असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे.”

आज ‘न्याय यात्रेची’ नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? हाच प्रश्न आहे.

वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे विसरले असतील तर काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते ते ऐकाच, असा टोलाचंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.