उद्यापासून जळगावचे वातावरण पुन्हा बदलणार ; आगामी ५ दिवस असे राहणार तापमान?

जळगाव । राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यावरही अवकाळीचे ढग असले तरी उन्हाचा चटका मात्र कायम आहे. यातच उद्या गुरुवारपासून जिल्ह्यात काही दिवस उन्हाचा पारा पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आज बुधवारी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दुपारनंतर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसासोबतच गारपिटीचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  मात्र अवकाळीच्या धारा कोसळण्याऐवजी अंगातून घामाच्या धारा वाहत आहे.

जिल्ह्यात १६ मेनंतर वातावरणात बदल होऊन, जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. १६ ते १९ मे दरम्यान जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२-४३ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

आगामी पाच दिवस असे राहणार तापमान
१५ मे रोजी तापमान ४० अंशपर्यंत तर दुपारनंतर वादळी पावसाचा अंदाज
१६ मे रोजी तापमान ४१ अंशपर्यंत तर वातावरण काही अंशी ढगाळ राहील
१७ मे रोजी तापमान ४२ अंशपर्यंत तर वातावरण सकाळी कोरडे व सायंकाळनंतर ढगाळ
१८ मे रोजी तापमान ४३ अंशपर्यत तर कोरडे वातावरण
१९ मे रोजी तापमान ४३ अंशपर्यंत तर कोरडे वातावरण