उन्मेश पाटलांचं तिकीट का कापलं ? पहिल्यांदाच बोलले फडणवीस

पाचोरा : जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डावलून स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं आहे. यामुळे नाराज झालेले श्री. पाटील यांनी उबाठा (शिवसेना गट) प्रवेश केला आहे. मात्र, उन्मेश पाटलांचं तिकीट का कापण्यात आलं ? याच उत्तर आजवर कुणीच दिलं नव्हतं. दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच येथील जाहीर सभेत उत्तर दिले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
भाजपच्या उमेदवाराला तुम्ही भर भक्कम पाठिंबा दिला. मोठ्या मताने तुम्ही त्यांना निवडून आणलं, पण बंधू-भगिनींनो मोठ्या मताने निवडून आणल्यानंतर पाच वर्षांमध्ये त्यांचा जो व्यवहार होता. खर म्हणजे निवडणुकीचा काळ आहे सगळ्या गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात. त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही, पण एकदा त्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कटलं ? तर त्यांच्या लक्षात येईल की काय काय चुका त्यांच्या हातून झाल्या आहेत. खरं म्हणजे त्यांचं तिकीट कापून आम्ही एक प्रकारे त्यांना त्या ठिकाणी वाचवलं असंच मी म्हणेन, ज्या मार्गाने ते चालले होते त्या मार्गाने जाण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त केलाय, पण मी यापेक्षा अधिक त्यांच्याबद्दल बोलणार नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उन्मेश पाटलांचे नाव घेता त्यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला.

 ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला विश्वास आहे की ताईंसारख्या ज्यांनी या जिल्ह्यामध्ये प्रचंड काम केलाय. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक आमदार म्हणून विधान परिषदेच्या त्यांनी जनसामान्यांमध्ये आपली एक प्रतिमा उभी केली आहे. मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण सगळे लोक ताईंच्या पाठीशी उभे राहाल.बंधू -भगिनींनो जसं मी सांगितलं ही निवडणूक ही साधी निवडणूक नाहीये या निवडणुकीमध्ये देशाचा नेता निवडायचा आहे. कोणाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील, कोण देशाला विकासाकडे नेल, कोण सामान्यांचे आशा आकांक्षाने अपेक्षा पूर्ण करू शकतो, कोण आपल्या जीवनात परिवर्तन आणू शकतो, याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे, असेही ते म्हणाले.