उन्हाच्या झळा वाढल्या; वन्यजीव नागरी वस्त्यांकडे कूच

पाचोरा : वाढत्या तापमानामुळे जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटत आहेत. परिणामी पाण्यासाठी वानरसेनेसह वन्यजीव नागरी वस्त्यांकडे कूच करीत असल्याची स्थिती पाचोरा शहरात पहायला मिळत आहे.

पाचोरा शहरातील जनता वसाहतमध्ये दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास एका घराच्या प्रांगणात पाण्याने भरून ठेवलेल्या पाण्याच्या टाकीच्या आडोशाला एक भला मोठा नाग नावाचा सर्प आढळून आला. सध्या तापमान वाढत असल्याने जंगलात अन्न, पाणी मिळत नसल्याने हे थंड जागेचा किंवा सावलीचा आश्रय घेत आहेत.

तसेच  रविवारी भर उन्हात माकडांचा वावर हा नागसेन नगर भागात आढळून आला. यावेळी नागरिकांनी त्या माकडांना अन्न, पाणी ठेवले. त्याचा स्वाद घेऊन पुढील प्रवासाला रवाना झाले. उन्हाळ्यात शासनासह नागरिकांनी प्राणिमात्रांची काळजी घेणे गरजेचे आहे.