मुंबई । सोलापूरच्या मोहोळमधील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांनी पुढचं बिल द्यायचं नाही, आणि मागचंही ही द्यायचं नाही. पुढील 15 दिवसाच्या आत पुढचं मागच्या बिल शून्य होणार आहे. असं म्हटलं आहे.
यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. आम्ही विकासासाठी आणि कामासाठी सरकारमध्ये गेलो आहोत, पहिले अडीच वर्ष आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही होतो तेंव्हा ही आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. आज मी महायुतिमध्ये असलो तरी सेक्युलर विचार सोडला नाही. मी सकाळी 6 वाजता उठून कामाला सुरुवात करतो, मात्र काही जण माझी टिंगल टवाळी करतात मात्र मी त्याला फार लक्ष देत नाही, असा विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
‘आम्ही मजा करायला आणि मिरवनुका काढून जल्लोष करायला येत नाही. कधी चुनावी जुमला केला नाही, 2004 निवडणूकीच्या आधी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेंव्हा मी नवखा होतो. तेंव्हा शेतकऱ्यांना वीज बिल माफी करायची असं जाहीरनाम्यात म्हटलं गेलं, शेतकऱ्यांची मत घेऊन आम्ही सत्तेवर आलो, त्यानंतर काँग्रेसने विलासराव यांना मुख्यमंत्री केले, लोकांनी वीज बिल माफिच्या नावाने मत दिली तेंव्हा लोक तोंडात शेण घालतील असं मी म्हटलं होतं, मात्र विलासराव ते सुशीलकुमार शिंदे यांचा निर्णय होता असं म्हणाले”
मात्र आता “हा चुनावी जुमला नाही. आउटडेटेड झालेल्या योजना बंद करून चांगल्या योजना आणायच्या आहेत. जरी मी मुंबईला राहतो असलो तरी माझी उसाची शेती, पोल्ट्री आणि दुधाची डेअरी आहे. शेतकऱ्यांनी पुढचं बिल द्यायचं नाही, आणि मागचंही ही द्यायचं नाही. पुढील 15 दिवसाच्या आत पुढचं मागच्या बिल शून्य होणार आहे. तुम्ही महायुती सरकार आणा पुढील पाच वर्ष बिल द्यावं लागणार नाही, हा दादाचा वादा आहे,” असे आवाहनही अजित पवार यांनी केले.