तरुण भारत लाईव्ह । १५ ऑक्टोबर २०२३। आजपासून नवरात्र सुरु झाले असून आज नवरात्रीची पहिली माळ आहे. नवरात्रीचे नऊ दिवस भाविक भक्तिभावाने नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतात. नवरात्रीचे नऊ दिवस साबुदाणा, भगर, रताळ्याचे फोडी, इ पदार्थ उपवासाला खाल्ले जातात. पण तुम्ही कधी उपवासाची मिसळ खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर आज घरी नक्की करून पहा. उपवासाची मिसळ घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
शेंगदाणे, भिजवलेला साबुदाणा, मिरच्या, जीरे, दही, बटाटा भाजी, फराळी चिवडा, मीठ, तूप
कृती
सर्वप्रथम, साबुदाण्याची खिडची करुन घ्यावी. शेंगदाणे, मिरची, मीठ वाटून त्याची आमटी बनवून घ्यावी. आमटीला तूप आणि आमसूलाची फोडणी घालावी. एका मोठ्या भांड्यात खिचडी. बटाटा भाजी आणि शेंगदाण्याची आमटी एकत्र करावी. त्यावर गोडसर दही, फराळी चिवडा आणि भाजलेले शेंगदाणे घालावे. तयार आहे उपवासाची मिसळ.