तरुण भारत लाईव्ह । ११ सप्टेंबर २०२३। आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार म्हणजे आज बऱ्याच जणांचा उपवास असणार पण उपवासाचे तेच तेच पदार्थ खायचा पण कंटाळा येतो. मग अशावेळी काय वेगळं करायचं हा प्रश्न पडतो. तर अशावेळी तुम्ही उपवासाचे बटाटे वडे करू शकता हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
बटाटे, शेंगदाणा तेल, साजूक तूप, जिरे, आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, साबुदाणा, राजगिरा, शिंगाडा, केळ्याचे पीठ.
कृती
सर्वप्रथम बटाटे उकडावेत त्यानंतर बटाटे स्मॅश करून घ्यावे कढईत तेल किंवा तूप घालून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करावी. या मध्ये आलं मिरची पेस्ट मीठ आणि कोथिंबीर घालावी यानंतर स्मॅश केलेला बटाटा परतवून घ्यावा वर दिलेले कोणतेही पीठ घेऊन बटाटेवडे तळून घ्यावे. तयार आहे उपवासाचे बटाटे वडे.