गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. अशातच, येत्या काही दिवसांत भीषण उष्मा असणार आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, मध्य, उत्तर मैदानी आणि दक्षिण भारतातील अनेक भागात यावर्षी उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या वाढू शकते. म्हणजेच यावेळी उष्णतेची लाट आणखी दिवस राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की एप्रिलमध्ये उष्णतेचा परिणाम पश्चिम मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक दिसून येईल.