उष्णतेतून दिलासा नाहीच! जळगावसह सहा जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा, वाचा हवामान खात्याचा हा अंदाज?

जळगाव । यंदाचा मे महिना जळगावकरांना त्रासदायक ठरत आहे. तापमानाने ४५ अंशावर मजल मारल्याने बाजून काढणाऱ्या उन्हामुळे जळगावकर चांगलाच हैराण झाला आहे. उकाड्यापासून कधी सुटका मिळेल याची प्रतीक्षा जळगावकर करीत आहे. मात्र हवामान खात्याने आज २७ मे रोजी जळगावसह सहा जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा दिला आहे. जळगाव, धुळे, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही जिल्ह्यांना अवकाळीचा फटका तर काही जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट अशी स्थिती पाहायला मिळतेय. राज्यातील मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णता प्रचंड वाढली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर गेला. यामुळे प्रचंड उष्णता जाणवली. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. मात्र असह्य करणारा उकाडा कायम आहे. जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे.

27 मे रोजी धुळे, जळगाव, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.