जळगाव : जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहेत. यामुळे नागरिकांसह मुक्याजनावरांना, पशु-पक्षींना चांगलाच फटका बसत आहेत. त्यामुळे पशुधनाची उष्णतेपासून कसा बचाव करावयाचा ? याबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून काही उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया…
१. पशुधनास फ्रक्त दिवसाच्या थंड वेळी चरावयास सोडावे,उष्ण कालावधीत सावलीत अथवा हवेशीर निवा-यात ठेवावे.
२. पशुधनाची वाहतुक फक्त सकाळी व संध्याकाळी करावी. दुपारी ११ ते ४ याजेपर्यंत वाहतुक करु नये.
३. उन्हाळा संपेपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येऊ नये,
४. पशुधनासाठी स्वच्छ व थंड पिण्याची पाण्याची सोय असावी. पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावी. शक्यतो पिण्याच्या पाण्याचे हौद गोठ्याजवळ व सावलीत असावेत.
५. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध करुन द्यावा,
६. पशुपालनासाठी मुक्त संचार गोठ्याचा जास्तीत जास्त वापर करावा व गोठ्यात स्प्रिंकलर वापरावे.
७. शेतीच्या, वहनाच्या व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या (शक्यतोदिवसा ११ ते ४ वाजेपर्यंत) वेळी विश्रांती द्यावी. बैलांना दुपारी कामास जुंपु नये.
८. पशुधनास पुरेसे पशुखाद्य व चारा/वैरण द्यावे.
९. पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी स्प्रिंकलर / फॉगर ची सोय करावी. इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारावे तसेच शक्य असल्यास फॅन/कुलर लावावेत.
१०. पशुखाद्य देतांना पुरेसेक्षार व जिवनसत्वे मिश्रणे द्यावीत. उत्पादक/दुभत्या पशुधनास संतुलीत आहार द्यावा.
११. पशुधनास उघड्यावर बांधु नये किंवा पार्क केलेल्या गाडीत सोडुन जाऊ नये.
१२. पशुधनाची गर्दी करु नये व दाटीवाटीने बांधु नये. विरळ विरळ बांधावीत
१३. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फ़ार दुर व फ़ार वेळ चालावे लागु नये याची दक्षता घ्यावी.
१४. मुक्त संचार गोठा रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीकडुन अनुदानातुन अवलंब करण्यात यावा.
१५. निकृष्ठ चा-याची पौष्टीकता वाढविण्यासाठी चा-यावर पशुवैद्यकांच्या सल्याने ३-५ टक्के युरीया व मोर्लेसेस प्रक्रिया करण्यात यावी
१६. जनावरांना कडबा पेंडी ऐवजी चाफ कटर च्या सहाय्याने कुटटी करुन त्याचा वापर करावा, जेणेकरुन चारा वाया जाणार नाही
१७. पावसाच्या पाण्याने भिजलेला चारा काळा पडल्यास / खराब झाल्यास त्यावर चुन्याची निवडी (१ किलो चुना २० लि पाणी/२०० किलो चारा टॉक्सीन बाईडर १ किलो/टन चा वापर करावा.
१८. किसान क्रेडीट कार्ड योजनेअंतर्गत दुध उत्पादक पशुपालकांना पशुधन विषयक कर्ज मर्यादा १.६० लक्ष आहे. या योजनेमध्ये कर्जावरील व्याजदरामध्ये २ टक्के पर्यंत सवलत राहिल आहे. सदर योजना कोणत्याही पशुधन खरेदीसाठी नसुन त्यांच्या व्यवस्थापनावरील खर्चासाठी आहे.