ऋतुराजने केली नवी सुरूवात, सायली म्हणाली…

IPL २०२३ : आयपीएल 2023 संपली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करून विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दोन चेंडूत 10 चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकला. अन् त्यानंतर चेन्नईनं ट्रॉफिवर नाव कोरलं. सर्वत्र चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचीच चर्चा सुरु आहे. त्याच्या संघाच कौतुक होत असतांनाच याच संघातील एक खेळाडू वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. तो खेळाडू म्हणजे चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड.

ऋतुराजने आयपीएलची ट्रॉफी हातात घेऊन फोटो काढला आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती आहे. फोटोतील ती व्यक्ती ऋतुराजची होणारी पत्नी आहे.  ऋतुराजने  पोस्टमध्ये लिहिले आहे, माझ्या आयुष्यातील दोन अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती. तर त्याने लिहिलं आहे, आनंद साजरे करण्यासाठी काय सुंदर वर्ष आहे!

https://www.instagram.com/p/Cs2F-juPQyy/?utm_source=ig_embed&ig_rid=5fc4a879-de21-4df8-88d9-dfa33674759d/

ऋतुराजने केलेल्या पोस्टने अनेकजण गोंधळून गेले आहेत. कारण काल परवापर्यंत सर्वजण ऋतुराजचं नाव अभिनेत्री सायली संजीवशी जोडत होते आणि अचानक त्यांचे त्याच्या लाईफ पार्टनरशी सर्वांना ओळख करून दिली आहे. उत्कर्षा असे ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आहे. विशेष म्हणजे ऋतुराजच्या या पोस्टवर अभिनेत्री सायली संजीवने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री सायली संजीवने ऋतुराजच्या पोस्टवर ‘दोघांचे मनःपूर्वक अभिनंद उत्कर्षा आणि ऋतुराज’ अशी कमेंट केली आहे. सायलीसह ऋतुराजच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट केली आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे ईशा केसकर, सलील कुलकर्णी यांनीही कमेंट केली आहे. या सर्व प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. तसेच ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीविषयी जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत.