पंतप्रधान ऋषी सुनक देणार दहशतवादी हमास समर्थकांना स्पष्ट संदेश

इस्रायल-हमास युद्धाचा आज १३वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत एकूण १,३०० निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संकटाच्या काळात इस्रायलला अनेक देशांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. बुधवारीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. आज ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आज इस्रायलला पोहोचले आहेत.
बुधवारी, जो बायडन यांनी इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. बैठकीनंतर ते म्हणाले की, “अमेरिका इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. आम्ही शेवट पर्यंत इस्रायला पाठिंबा देत राहणार” त्यातच आज ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक देखील इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत.
ऋषी सुनक आपल्या दौऱ्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी द्विपक्षीय बैठक करतील. या दोघांच्या दौऱ्याचा उद्देश हमासला इशारा देण्याचा आहे, की संकटाच्या काळात इस्रायलच्या पाठीशी त्याचे मित्र उभे आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण इस्रायला पाठिंबा दिला आहे.