एकनाथ शिंदे रमले पुन्हा शेतात; दुचाकीवरुन फेरफटका

साताराः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांपासून मूळ गावी गेलेले आहेत. तिथे त्यांनी शेतीत काम केलं, जनता दरबार भरवला आणि थेट दुचाकीवरुन रपेट मारली. सातारा जिल्ह्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून ते दोन ते तीन वेळेस गावी गेलेले आहेत. आताही ते त्यांच्या मुळगावी गेले असून तेथे ते शेतात रमलेले दिसत आहेत.

मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री गावी गेलेले आहेत. त्यांनी एका दुचाकीवरुन गावात फेरफटका मारला. शिवाय शेतीमध्ये जावून पिकांची पाहाणी केली आणि कामंही केलं. मुख्यमंत्र्यांनी गावातील आणि परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवला. कोयना धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्र्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांचा हा सुट्टीचा कालावधी असतांना या दौर्‍यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेऊन कामाचा झपाटा सुरुच ठेवला आहे. परिसराच्या गावातील लोक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गर्दी करत आहेत. यामुळे ते सुट्टीवर असूनही कामावर आहेत, असेच दिसून येत आहेत.