एकलव्य विद्यालयात ‘माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम !

नंदुरबार : एकलव्य विद्यालयात आज माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक – विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदयित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा हे अभियान शासनाद्वारे राबवण्याचे प्रस्तावित आहे.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश असलेले पत्र विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येऊन त्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. या पत्राची सविस्तर माहिती, त्यामागील शासनाचा उद्देश व हेतू याबाबत सविस्तर माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुहासिनी नटावदकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दिली.

या अभियानात सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका सौ शैलजा कापडिया, पर्यवेक्षक शंकर सोनार, धर्मेंद्र मराठे, टिका पाडवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.