---Advertisement---

एकाच पक्षातील खासदार आणि मंत्र्यांकडून एकमेकांना अश्लिल शिवीगाळ…; ऑडिओ क्लिप व्हायरल

---Advertisement---

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आरोप, प्रत्याआरोप आणि टीका दररोज दिसून येतात. मात्र, आता मंत्री आणि खासदार यांच्यात शिवीगाळ आणि खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेषतः एकाच पक्षातील मंत्री आणि खासदारांची एकमेकांना शिवीगाळ करण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

शिवसेनेचे (शिंदे गटाचे) मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ करण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तर हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत.

निधी वितरित करण्याच्या कारणावरून खडाजंगी 

या बैठकीमध्ये निधी वितरित करण्याच्या कारणावरून आणि टक्केवारीच्या कारणावरून हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चक्क शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची ‘तरुण भारत लाईव्ह ‘ पुष्टी करत नाही. पण ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपवरुन सामान्यांसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment