‘एकेकाळी दहशतवादी हल्ले करायचे, पण आता…’, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केले राष्ट्राला संबोधित

भारत आज ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी आज 11व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. या विशेष प्रसंगी सुमारे 6,000 पाहुणे उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विकसित भारताचा संकल्प, भाजप सरकारचे काम आणि इतर गोष्टींबद्दल भाष्य केले आहे. तसेच भारतीय लष्कराचे कौतुक केले. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा संदर्भ देत ते म्हणाले की, पूर्वी दहशतवादी हल्ले करायचे, आता लष्कर सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक करते.
पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा सैन्य हल्ला करते तेव्हा देशातील तरुणांची छाती अभिमानाने भरते. यासोबतच कोविड महामारीचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, जगातील सर्वात वेगाने कोट्यवधी लोकांचे लसीकरण आपल्या देशात झाले.

पंतप्रधान म्हणाले, ‘आपल्या देशात करोडो लोकांच्या कोविड लसीकरणाचे काम जगातील सर्वात जलद गतीने झाले. कधी दहशतवादी आपल्या देशात येऊन आपल्याला ठार मारून निघून जायचे. जेव्हा देशाचे सैन्य सर्जिकल स्ट्राइक करते. तेव्हा देशातील तरुणांची छाती अभिमानाने भरून येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगतिले.