5 राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे ट्रेंड येऊ लागले आहेत. दरम्यान, सरकारला चांगली बातमी मिळाली आहे. दुसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीचा आकडा ७.५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSO ने गुरुवारी GDP ची आकडेवारी जाहीर केली.
आकडेवारीनुसार, विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा भारताच्या जीडीपीमध्ये दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 7.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे देशाची मध्यवर्ती बँक आरबीआयनेच 6.5 टक्के अपेक्षित धरली होती.