बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा नव्यांदा भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांनी आरजेडी विरोधात पहिली कारवाई केली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील अनेक आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष आरजेडी नेते अवध बिहारी चौधरी यांना हटवण्यासाठी विधानसभा सचिवांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
भाजप नेते नंद किशोर यादव आणि तारकिशोर प्रसाद (माजी उपमुख्यमंत्री); हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी; जेडीयूचे विनय कुमार चौधरी, रत्नेश सदा आणि एनडीए (NDA) आघाडीतील इतर आमदारांनी अवध बिहारी चौधरी यांना पदावरून हटवण्यासाठी नोटीस दिली आहे.