एरंडोलला नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा…!

एरंडोल : अंजनी धरण उशाशी असूनही पाणी वितरणाचे नियोजन नसल्यामुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. विशेष हे की सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून लग्न सरयीचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्याची दररोज घरोघर मोठ्या प्रमाणात गरज भासते. पण नळाला सुटणाऱ्या पाण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे गोरगरीब लोकांना रोजंदारी बुडवून नळाला पाणी येईल या प्रतीक्षेत थांबावे लागते.

एरंडोल हे तालुक्याचे शहर असून जवळच अंजनी धरणात यंदा मुबलक पाणी साठा आहे. तसेच वीज पुरवठा देखील नियमित होतो. मात्र अशा स्थितीत एरंडोल वाशी यांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळें संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरात काही ठिकाणी नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी गटारींमध्ये धो धो वाहते त्याबाबत नगरपालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे.

ज्या भागात नळांना पाणी सोडले जाते त्यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून पाण्याची होणारी नासाडी थांबवावी अशी अपेक्षा आहे. काही ठिकाणी गच्चीवरची टाकी भरल्यानंतर गच्चीवरून पाणी खाली वाहते अशाप्रकारे पाण्याची होणारी नासाडी ला आडा अशी मागणी होत आहे. एका बाजूला पाणीपुरवठा ठरवून दिलेल्या निश्चित वेळेवर व्हावा. तर दुसरीकडे लाखो लिटर वाया जाणारे पाणी या प्रकाराला पाय बंद बसवावा असे सुजाण नागरिकांचे मत आहे.