एरंडोल नपातर्फे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा, शहरवासी त्रस्त

एरंडोल :  एरंडोल नपातर्फे शहरवासीयांना दूषित हिरवेगार, दुर्गंधीयुक्त, अस्वच्छ, पिण्यास अयोग्य असा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी शहरवासीयांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे योग्य तो शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना युवा सेनेतर्फे देण्यात आले. शिवाय पंधरा दिवसाच्या आत योग्य ती कारवाई केली न केल्यास तीव्र उपोषण करण्याचा इशारा दिला.

एरंडोल येथे अंजनी धरण असल्यावर सुद्धा एरंडोलकरांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. सन 2023 च्या उन्हाळ्यात अंजनी धरणात मृत साठा उपलब्ध असताना सुद्धा त्यावेळी चार दिवसाआड पाणीपुरवठा होत होता. पण सध्याच्या काळात अंजनी मध्यम प्रकल्पात बऱ्या प्रमाणात जलसाठा असूनही व लामंजन पाईपलाईन न पा कडे उपलब्ध असूनही एरंडोल वासियांना सामना करावा लागत आहे. निवेदन देताना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मनोज पाटील, बापू मराठे, भैय्या लोहार, अमोल तांबोळी, बंटी शेरवाणी, गणेश चौधरी, नरेश भोई, सोनू ठाकूर, भैया ठाकूर, सचिन पाटील, अमोल धोबी, आरखे दिलीप सोनवणे, निलेश चौधरी, ईश्वर पाटील, भूषण भोई, हरीश गांगुर्डे, चेतन मराठे, रोहित राजपूत व मयूर मराठे आदी उपस्थित होते.