---Advertisement---

एल्विशनंतर आता फाजिलपुरियाही जाणार तुरुंगात ! पोलिसांच्या रडारवर गायक

---Advertisement---

प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादव तुरुंगाच्या भिंतीमध्ये आपली रात्र घालवत आहे. एल्विश यादवने रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याची कबुली दिली आहे. यानंतर एल्विश यादवला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. एल्विशला गौतम बुद्ध नगर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. एल्विशच्या अटकेनंतर आता सिंगर फाजिलपुरिया नोएडा पोलिसांच्या रडारवर आहे.

नोएडा पोलिसांच्या चौकशीदरम्यान एल्विश यादवने फाजिलपुरियाच्या पार्टीचा उल्लेख केला होता. असे मानले जात आहे की नोएडा पोलिस लवकरच गायक फाजिलपुरियाला नोटीस पाठवू शकतात. नोएडा पोलीस सिंगर फाजिलपुरियाला न्यायालयीन कोठडीत घेऊन चौकशी करू शकतात.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment