तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण हे वाढत चालले असून अपघातात मृत होण्याच्या घटना हि वाढत चालल्या आहेत. अशातच मुंबई -आग्रा महामार्गावरुन एका भयंकर अपघाताची बातमी समोर आली आहे. महामार्गावरील चांदवड चौफुलीवर एसटी-कंटेनरचा अपघात झाला या अपघातात कंडक्टरचा जागीच ठार झाला असून कॉलेज विद्यार्थी आणि अन्य काही प्रवासी गंभीर जखमी झालेत.
सूत्रानुसार, मुंबई -आग्रा महामार्गावर एसटी-कंटेनरचा जोरदार अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा मागचा भाग पूर्णपणे कापला गेला. या अपघातात कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला आणि कॉलेज विद्यार्थ्यांसह काही प्रवासी गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.