‘एसडीएम’वरच पडली पोलिसांची काठी, लाठीचार्जचा व्हिडिओ व्हायरल

आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावर आरक्षण बचाओ संघर्ष समितीने पुकारलेल्या ‘भारत बंद’चा परिणाम महाराष्ट्र ते बिहारपर्यंत पाहायला मिळत आहे. एससी-एसटी आरक्षणात सब कॅटेगिरी ठेवून क्रिमिलियरची अट घातल्याच्या विरोधात विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात देशभरातील अनेक ठिकणी रस्त्यांवर टायर जाळपोळ, रास्ता रोको आंदोलन पाहायला मिळत आहे. दरम्यान बिहारमधून वेगळीच घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाठीचार्ज सुरू असताना पोलिसांच्या लाठ्या चुकून एसडीएमवरच (उपविभागीय दंडाधिकारी) पडल्या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर बंद समर्थकांनी डाक बंगला चौकातून एसपी वर्मा रोडच्या दिशेने धाव घेतली. तेथे पाटणा सदरचे एसडीएम डीजे कार्टजवळ उभे होते. बंद समर्थकांनी ही डीजे गाडी आणून जोरदार घोषणाबाजी केली. पाटणा सदरचे एसडीएम श्रीकांत कुंडलिक खांडेकर हेही त्याच गाडीजवळ उभे होते. व्हिडिओमध्ये ते  पांढरा शर्ट घातलेला दिसत आहे. दरम्यान, मागून आलेल्या एका हवालदाराने एसडीएमला काठीने मारहाण केली. एसडीएमला काही समजेपर्यंत कॉन्स्टेबलने एसडीएमवर लाठीचार्ज केला होता. मात्र, त्यानंतर लगेचच त्या शिपायाच्या इतर साथीदारांनी त्याला बाजूला घेतले आणि समजावून सांगायला सुरुवात केली.

एससी-एसटी आरक्षणासंदर्भात ‘भारत बंद’चा सर्वात मोठा परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. राजधानी पाटण्यात भारत बंददरम्यान मोठा गोंधळ झाला. येथे आंदोलक सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षण विरोधी निर्णय मागे घ्या अशा घोषणा देत आहे. सायन्स कॉलेजजवळ आंदोलक आक्रमक होऊ लागले. त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.