तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। ऐन सणासुदीत महागाईने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तूप साखर महागल्याने सणावळींचा गोडवा काहीसा कमी होताना दिसत आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत मैदा आणि रव्याचे दर काही प्रमाणात कमी असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. आता साखर पुन्हा एकदा महाग झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसात त्यांच्या किमती तीन टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी साखरेचे दर 37,760 रुपये प्रति टन पर्यंत वाढले जे ऑक्टोबर 2017 नंतरचे सर्वोच्च आहे विशेष म्हणजे साखरेच्या किमतीतील टक्क्यांनी वाढ झाल्याने गेल्या सहा वर्षातील उत्साहाने गाठला आहे. त्यामुळे गेल्यावर्षी 38 ते 40 रुपयांवर असलेली साखर आता प्रति किलो बेचाळीस हजार रुपयांवर गेली आहे.
प्रमुख साखर उत्पादक महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला असून त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याची व्यापारी आणि उत्पादकांचे म्हणणे आहे पीक हंगाम 2023 24 मध्ये ऊस उत्पादनात घट झाल्या साखर आणखीन महाग होऊ शकते. त्याचबरोबर साखरेच्या किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दर वाढू शकतात असे तज्ञांचे मत आहे.
याचा परिणाम खाद्यपदार्थांवर होऊ शकतात. खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. सध्या गणेशोत्सव सुरू आहे या उत्सवात प्रसादासाठी रवा मोठ्या प्रमाणावर लागतो तो स्वस्त आहे. मात्र तुपाचे दर प्रचंड महागले आहे. तसेच गोडवा पेरणारी साखर ही मागणी आहे. त्यामुळे गणेशोत्सवासह आगामी सणावळीतही महागाईचा चटका बसणार आहे.