तरुण भारत लाईव्ह । २९ सप्टेंबर २०२३। ऑक्टोबर महिन्यात बुध कन्या राशीत तर शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल. नंतर लगेच ३ ऑक्टोबरला मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल आणि या राशीत आधीच विराजमान असलेल्या केतू सोबत अशुभ युती तयार होईल. त्यानंतर ३० ऑक्टोबरला महिन्याच्या शेवटी राहू आणि केतूचे संक्रमण होईल. या बदलांमुळे ५ राशींना याचा फटका बसू शकतो. तर त्या कोणत्या राशी आहेत हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
वृषभ रास
या काळात वृषभ राशींच्या व्यक्तींना काही अडचणींना सामोरे जावं लागेल. नोकरीत मोठी जबाबदारी मिळाल्याने कामाचा ताण अधिक राहील. चिडचिड होऊ शकते. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा.
कर्क रास
या काळात कर्क राशींच्या लोकांना अधिक सावध रहायची गरज आहे. पैसा विनाकारण खर्च होईल. सावधगिरी बाळगा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक रास
या काळात वृश्चिक राशींच्या लोकांना खर्च प्रचंड वाढतील. तुम्हाला इच्छा नसूनही काही कामांवर खर्च करावा लागू शकतो. कुटुंबात ताण तणाव निर्माण होईल.