ऑक्टोबर हिट पासून असा करा बचाव

तरुण भारत लाईव्ह । १४ ऑक्टोबर २०२३। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा पाहायला मिळत आहे. दिवसाचा पारा ३७ ते ३८ अंशांवर गेल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.  तर रात्रीचा 12 17 ते 19 अंशांवर असल्याने दिवसा उकाडा तर रात्री थंडी अशा वातावरणामुळे आरोग्यावर देखील परिणाम होत आहे.

ऑक्टोबर हिटच्या पासून काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या आठवड्यात शहरातील दिवसाचा पारा ३७ पर्यंत पोहोचला होता. शुक्रवारी शहरातील तापमान ३४ अंशांवर होते त्यात वातावरणात आद्रता जास्त झाल्याने मोठ्या प्रमाणात उकडा देखील जाणवत आहे. ऑक्टोबर महिना हा ऋतुमान बदलण्याचा काळ असतो त्यामुळे संमिश्र वातावरण पाहायला मिळते. जिल्ह्यात सकाळी कडाक्याचे ऊन तर रात्री अल्हादायक गारवा जाणवत आहे. दिवसा व रात्रीच्या तापमानात सतरा ते अठरा अंशांचा फरक जाणवत आहे यामुळे आरोग्यावर परिणाम होतोय.

काय घ्याल काळजी
उष्माचा त्रास होत असेल तर उष्ण धर्मीय पदार्थांचे सेवन टाळा. तेलकट मसालेदार पदार्थ टाळा. संसर्ग असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करा वाढत्या तापमानामुळे अधिक थकवा जाणवतो अशावेळी भरपूर पाणी प्यायला हवे. फळांद्वारे देखील पाणी मिळते त्यामुळे फळांचा आहारात समावेश करावा.