उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लखनऊमध्ये एका कट्टरपंथीयाने आपली ओळख लपवून एका हिंदू महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ बनवून शारिरीक शोषण केले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीतापूर येथील एका महिलेचा तिच्या पतीसोबत वाद झाल्याने ती लखनऊमधील माडियाव परिसरात भाड्याने खोली शोधत होती. यावेळी तिची ओळख एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या मोहम्मद हसनशी झाली. त्यानंतर त्याने तिचा मोबाईल नंबर मोहम्मद मजहर नावाच्या आपल्या मित्राला दिला.
मोहम्मद मजहरने आपली ओळख राहूल अशी सांगत त्या महिलेशी जवळीक वाढवायला सुरुवात केली. त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्न करण्याचे आमिष दाखवले. यादरम्यान, त्याने पीडितेला नशेचे पदार्ख खायला देत तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर त्याने पीडितेचा अश्लील व्हिडीओ बनवत तिचे शारिरीक शोषण करण्यास सुरुवात केली.
मात्र, काही दिवसानंतर पीडितेला त्याचा खरे रुप कळले आणि तिने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मोहम्मद मजहरने तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव आणला. याशिवाय तिच्या मुलांचेही धर्मांतर करत पासपोर्ट आणि व्हिसा मिळवून पाकिस्तानला जाऊन राहू असेही त्याने तिला सांगितले.
या सगळ्याला महिलेने विरोध केल्यावर मोहम्मद मजहरने पीडितेला तिच्या मुलांना आणि पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, याप्ररणी आरोपी मोहम्मद मजहरला अटक करण्यात आली आहे.