मुंबई । अभिनेत्री कंगना रनौत तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. कंगना रणौत कोणत्याही विषयावर आपले मत व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाही. नुकतीच ती अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेत सहभागी झाली होती. या सोहळ्यातील विविध फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यातील एका फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं.
‘इझी माय ट्रिप’चे संस्थापक निशांत पिट्टीसोबतचा कंगनाचा हा फोटो होता. हा फोटो पाहिल्यानंतर कंगना निशांतला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या चर्चांवर अखेर बॉलिवूडच्या ‘क्वीन’ने मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित कंगनाने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे.
कंगनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिच्या नात्याचा खुलासा केला. अभिनेत्रीने निशांत पिट्टीसोबतच्या तिच्या नातेसंबंधाच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आणि ती त्याला डेट करत नसल्याचे स्पष्ट केले.
निशांत पिट्टीजी यांचं लग्न झालेलं आहे आणि मी दुसऱ्या व्यक्तीला डेट करतेय. योग्य वेळेची प्रतीक्षा करा आणि कृपया आम्हाला लाजिरवाणं वाटेल असं काही करू नका.’ कंगनाने पहिल्यांदाच अशा पद्धतीने तिच्या रिलेशनशिपचा खुलासा केला आहे. मात्र ती कोणाला डेट करतेय, हे अद्याप तिने सांगितलं नाही. या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलंय, ‘फक्त सोबत फोटो क्लिक केल्यामुळे एका तरुण महिलेला दररोज एका नव्या पुरुषाशी जोडणं बरोबर नाही. कृपया असं करू नका.’ या पोस्टच्या अखेरीस तिने हात जोडलेले इमोजी पोस्ट केले आहेत.