कच्छी दाबेली रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । १० ऑक्टोबर २०२३। संध्याकाळी भूक लागली कि खायला काहीतरी वेगळं हवं असत पण वेगळं असं काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो. तर अशावेळी तुम्ही दाबेली बनवू शकता. दाबेली घरी करायला खूप सोप्पी आणि झटकन होणारी रेसिपी आहे. तर दाबेली कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
पाव, बटाटे, कांदे,  तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला, मीठ-साखर, बटर, चिंचेची पेस्ट, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे, बारीक शेव.

कृती
सर्वप्रथम, एका कढईत बटर घालून  कांदे परतून घाव्यात. त्यानंतर तिखट, हळद, धणे-जिरेपूड, गरम मसाला, चाट मसाला घालावा. हे मिश्रण परतून घ्यावं नंतर  त्यात अर्धी वाटी पाणी घालून उकळी आली की मीठ-साखर घालावी. त्यावर उरलेला कांदा, सगळी कोथिंबीर, शेंगदाणे नि डाळिंबाचे दाणे घालून सर्व तयार ठेवावं. मग एका फ्राय पॅनवर बटर घालून मध्ये कापलेला पाव छान भाजून घ्यावा .एका बाजूला चिंचेची पेस्ट आणि मध्ये भाजी घालून परत कांदे नि डाळिंबाचे दाणे घालून अजून फ्राय करावा. आणि दाबेली सर्व्ह करावी.