नंदुरबार : कत्तल करण्याच्या इराद्याने बांधुन ठेवण्यात आलेल्या ७१ गोवंश जनावरांची नवापूर पोलिसांनी करावाई करत सुटका केली. नवापूर शहारातील इस्लामपुरा परीसरात ही कारवाई करण्यात आली. यात ४ लाख २२ हजार रूपये किंमतीच्या ७१ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी १२ जणांविरूध्द नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवापूर शहारातील इस्लामपुरा परीसरात ४ लाख २२ हजार रूपये किंमतीच्या ७१ गोवंश जनावरांची अवैधरित्या कत्तल करण्याच्या इराद्याने व त्यांची बेकायदेशीर वाहतूकीसाठी बांधुन ठेवण्यात आल्याची पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे व उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार विभाग संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम निकम, पोलीस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पाटील, पोउनि मुकेश पवार, स्थागुशा, पोउनि मनोज पाटील, विशाल सोनवणे, नवापूर पोलीस ठाणे, प्रतिक भिंगारदे व स्थानिक गुन्हे शाखा पथक व पोलीस ठाणे पथक यांनी नवापूर शहरातील इस्लामपुरा भागातील खालील नमुद आरोपींचे ताब्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बंदिस्त खोल्यांमध्ये एकूण ७१ गोवंश जनावरे हे अवैधरित्या कत्तल करण्याचे इरादयाने व त्यांची बेकायदेशीर वाहतुक करणेसाठी निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत मिळून आले. त्या संदर्भात हासीम कासीम कुरेशी, जुबेर ऊर्फ बहिऱ्या रेहमान कुरेशी, रऊफ दाऊद कुरेशी, शाहरुख सलीम कुरेशी, अरबाज बुसूफ कुरेशी, जाकीर ऊर्फ पटटो अजीज कुरेशी, समीर अस्लम कुरेशी, फकीरा इब्राहिम कुरेशी, अहमद खान अजिज खान, आबिद दाऊद कुरेशी, इन्नु ऊर्फ इनायत खान दिलेर खान कुरेशी, इरफान खान सईद कुरेशी सर्व रा.इस्लामपूरा, ता. नवापूर जि. नंदुरबार यांच्याविरुध्द नवापूर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.