भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळणे शक्य होत नाही. सीट्स फुल्ल असल्यामुळे लोकांना वेटिंग तिकीट घ्यावे लागते, कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी असते. जर तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल आणि या समस्येचा सामना करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगतो ज्याद्वारे तुम्ही कन्फर्म तिकीट मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला जी पद्धत सांगणार आहोत ती पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे.
यापूर्वी ट्रेनमध्ये प्रवास करताना रिकाम्या जागांची माहिती घेण्यासाठी प्रवाशांना टीटीईच्या मागे धावावे लागत होते. पण आता तसे राहिले नाही. जर तुम्ही रिक्त बर्थ शोधत असाल तर तुम्हाला यासाठी TTE किंवा TC कडे जाण्याची आणि फेऱ्या मारण्याची गरज नाही. आता तुम्हाला एका क्लिकवर कळू शकते की कोणत्या कोचमध्ये कोणता बर्थ उपलब्ध आहे.
असे मिळेल तुम्हाला कन्फर्म तिकीट
सर्व प्रथम IRCTC मोबाईल ऍप्लिकेशनवर जा.
आता ट्रेन पर्यायावर जा.
येथे तुम्हाला Chart Vacancy नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
यानंतर तुमच्या ट्रेनचे नाव किंवा नंबर आणि स्टेशन टाका.
आता तुम्हाला ज्या कोचमध्ये जागा हवी आहे त्यावर क्लिक करा.
तुम्हाला कोचमधील सर्व रिकाम्या जागांची यादी मिळेल.
आता तुम्ही ट्रेनमध्ये त्या सीटवर जा, TTE आल्यानंतर त्या सीटसाठी बनवलेले तिकीट जागेवरच मिळवा.
आता तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय आरामात प्रवास करता येणार आहे.