‌‘कमिशन’चे खेळ अति झाले… माजी महापौरांच्या दिवाळीच्या सूचक शुभेच्छा !

डॉ.पंकज पाटील
जळगाव : राज़्यभरात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. प्रकाशपर्वात आप्तस्वकिंयासह हितचिंतक, मित्र परिवार यांना शुभेच्छा पत्रांसह सोशल मीडियासह प्रत्यक्ष्ा भेटून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र उबाठा गटाच्या माजी महापौरांनी ‌‘अंधार फार झाला’ या शुभेच्छा पत्रातून ‌‘कमिशनचे खेळ अति झाले…..पारदर्शकतेचा प्रकाश पाहिजे’ अशा शब्दात दिवाळीच्या सूचक शुभेच्छा दिल्या आहेत.

महापौरपदाचा कार्यकाळ संपून अडीच महिने झालेत. महापौर असताना महासभेत मंजुर केलेल्या कामाची अंमलबाजवणी मनपा प्रशासनाने करावी, अशी कळकळची विनंती त्यांनी कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी केली होती. त्यातील अनेक कामे मनपा प्रशासन करत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली होती. येत्या काही महिन्यात शहरात विकासाचे चित्र दिसेल ते त्यांच्या कार्यकाळात घेतल्या गेलेल्या निर्णयाचे फलीत असेल, असेही त्यांनी माध्यमांसमोर सांगितले होते.

तरीही अंधार फार झाला…

महापौर म्हणून काम करत असताना अनेकांशी शाब्दीक मतभेद झाले असतील, पण ते तेवढ्यापुरताच. मनपाचे आयुक्त, उपायुक्त, अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबतच विरोधकांसह आमदार, खासदार, नेत्यांनीही सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगीतले होते. असे असतानाही..

‌‘ अंधार फार झाला,

आता दिवा पाहीजे,

निधीचा गवगवा उदंड झाला,

आता विकास पाहिजे,

कमिशनचे खेळ अति झाले,

पारदर्शकतेचा प्रकाश पाहिजे,

आता या काळोखाला भेदणारी,

एक पणती पाहिजे…

अशा शब्दात त्यांच्या दिवाळीच्या शुभेच्छाच्या पोस्ट महापौर सेवा कक्ष्ा या व्हॉटसॲप वरील सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. सूचक शुभेच्छा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माजी महापौरांच्या या दिवाळीच्या सूचक शुभेच्छांमुळे  अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. तर राजकीय व मनपातही याची जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टवर साधक बाधक प्रतिक्रिया उमटत असल्या तरी हा संदेश नेमका कोणासाठी आहे, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले असले तरी त्यातून बऱ्याच गोष्टी त्यांनी सूचकरित्या दर्शवत मान्यही केल्या आहेत.