धुळे : तालुक्यातील वेल्हाणे (कुंडाणे) शिवारातील एका शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यात गांजा फुलवण्यात आल्याची गोपनीय धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर पथकाने रविवार २२ रोजी छापा टाकत दोन लाख २० हजार १०० रुपये किमतीचा सुमारे ५५ किलो ओल्या गांज्याची झाडे जप्त केली. याप्रकरणी वेल्हाणे- कुंडाणे येथील परशूराम पुना ठाकरे या संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना गांज्या शेतीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. रविवारी दुपारी पोलिसांचे पथक वेल्हाणे- कुंडाणेतील परशुराम ठाकरे यांच्या शेतात धडकल्यानंतर शेतालगतच्यानाल्यात गांजाची बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी ५५ किलो ५५ ग्रॅम वजनाचे चार ते पाच फूट उंचीचे झाडे जप्त केली. संशयित ठाकरे याच्याविरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, प्रकाश सोनार, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, प्रशांत चौधरी, चालक राजीव गीते आदींच्या पथकाने केली.