कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला!

Karnatka politics : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार यावरुन दोन दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर झाला आहे.  कॉंग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

डी. के शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरू होती. अखेर यामध्ये सिद्धरामैय्या यांनी बाजी मारली असून उद्या मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामैय्या यांचा शपथविधी होणार आहे. चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काँग्रेसने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अखेर निश्चित केले. पक्षाने सिद्धरामय्या यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार, सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री असतील. डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री यांच्यासह ऊर्जा आणि पाटबंधारे आणि प्रदेशाध्यक्ष ही दोन खाती असतील. 18 मे रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. दोन्ही नेते 10 मंत्र्यांसह शपथ घेणार आहेत.