कर्मचारी निवड आयोगाने (SSC) दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये उपनिरीक्षक भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1876 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. महिला उमेदवार SI पदासाठी देखील अर्ज करू शकतात.
इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणारे उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 जुलै ते 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल. अर्जातील दुरूस्तीची विंडो 16 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान उघडेल. संगणक आधारित परीक्षा ऑक्टोबर 2023 मध्ये होणार आहे आणि तपशीलवार वेळापत्रक नंतर प्रसिद्ध केले जाईल.
एकूण रिक्त पदांची संख्या – 1876
रिक्त पदांचा तपशील:
1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 109
2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 53
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 1714
कोण अर्ज करू शकतो?
मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएशन पदवी किंवा समकक्ष परीक्षेत बसलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात परंतु त्यांच्याकडे कट ऑफ तारखेला किंवा त्यापूर्वी पदवी असणे आवश्यक आहे (15 ऑगस्ट).
वयोमर्यादा
1 ऑगस्ट रोजी ज्या उमेदवारांचे वय 20-25 वर्षांच्या दरम्यान आहे ते या पदांसाठी अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार सूट लागू होईल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती अधिसूचनेत तपासली जाऊ शकते.
अर्ज फी
र्ज शुल्क रु. 100 आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
किती पगार मिळेल?
रु. 35400-112400/- (पे स्तर 6) (मूळ वेतनाव्यतिरिक्त, उमेदवारांना इतर भत्ते आणि फायदे देखील दिले जातात)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:00 PM)
जाहिरात पहा