सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने SSC CHSL 2024 ची अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे 3712 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या विविध विभाग/मंत्रालयांमध्ये ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 पर्यंत आहे.
या पदांसाठी होणार भरती?
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) 3712
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
भरतीसाठी आवश्यक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – वेतन स्तर-2 (रु. 19,900-63,200).
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) -पे लेव्हल-4 (रु. 25,500-81,100) स्तर-5 (रु. 29,200 – 92,300/-)
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’वेतन स्तर-4 (रु. 25,500-81,100)
वय मर्यादा : 18 ते 27 वर्षे ( सरकारी नियमानुसार वयात सूट मिळेल)
अर्ज फी : अर्जाची फी रु 100 आहे. महिला उमेदवार, SC/ST, अपंग, माजी सैनिकांसाठी अर्ज विनामूल्य आहे.