कलावती पाडवी फाउंडेशनतर्फे भजन स्पर्धा, १५० मंडळांनी नोंदविला सहभाग

तळोदा : शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी व कै.कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भजन स्पर्धेचे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, 26 रोजी आमदार पाडवी यांच्या हस्ते येथील माळी समाज मंगल कार्यालयात करण्यात आले. ही स्पर्धा दि. 26, 27 आणि 28 अशी तीन दिवस असणार आहे. स्पर्धेत जवळजवळ 150 मंडळांनी सहभाग नोंदविला आहे.

तळोदा तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील भजनी कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांच्या संकलपनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 31 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 21 हजार रुपये, उत्तेजनार्थ पाच हजार रुपये तसेच उत्कृष्ठ गायक, १००१ रुपये उत्कृष्ठ तबला, १००१रूपये उत्कृष्ठ झांजवादक,१००१ रुपये उत्कृष्ठ पखवाज,१००१ बक्षीसे देण्यात येणार आहेत.

उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, उपसभापती विजय राणा, तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी, शहराध्यक्ष गौरव वाणी, शिरीष माळी, अशोक वळवी, शिरीष माळी, सुभाष चौधरी, सतीश वळवी, दारासिंग दादा, अनिल माळी, योगेश पाडवी, अनिल परदेशी, गोविंदा पाडवी, योगेश गुरव, सचिन उदासी, राजू गाडे, श्रावन तिजविज, मयूर कलाल, जगदीश परदेशी, अमन जोहरी, दीपक परदेशी, आशुतोष पटेल, खुशाल चौधरी, ऋषिकेश पाडवी, नीलकंठ मराठे, निलेश वसावे, रवींद्र भिलाव, बाबुसिंग पाडवी, किरण पावरा, जयसिंग पाडवी, पावबा ठाकरे, किरण सुर्यवंशी, प्रफुल माळी आदी उपस्थित होते.