काँग्रेसचे आमदार फुटणार? ‘या’ खासदाराच्या दाव्याने खळबळ

maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत सत्तेत सामील झाले आहे. त्यांनतर आता काँग्रेसचे आमदार देखील लवकरच महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील, असा खळबळजनक गौप्यस्फोट माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे. त्यामुळे या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले आहे निंबाळकर?
महाविकास आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये सहभागी होतील, असा दावाही यांनी केला. ते शनिवारी पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधत होते. काँग्रेस सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करीत असली तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाऊन काँग्रेसचे नुकसान होईल, अशी त्यांच्यामध्ये भीती आहे.

त्यामुळेच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल, असेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले. अर्थमंत्री अजित पवार यांनी मतदार संघातील विकासकामांसाठीच सर्व पक्षांच्या आमदारांना भरीव असा निधी दिला आहे. त्यातून कोणी आमदार स्वतःची कामे करत नाही. आमदार रोहित पवारांना आमदार निधी विषयाचा अभ्यास थोडा कमी असावा, असा टोलाही खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लगावला.