धुळे : महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाषजी भामरे यांच्या प्रचारार्थ देवपूर पूर्व मंडलाच्यातर्फे बिलाडी रोड, एकता नगर येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी धुळे भाजप महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर होते.
काँग्रेसच्या जाहिरनाम्यात महिलांना दरवर्षी 1 लाख रु. देण्याची घोषणा अत्यंत फसवी असून या पूर्वी महिला संबंधी एकही योजना काँग्रेसने पूर्ण केली नसून “भाजपच्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने महिला विषयी अनेक योजना प्रत्यक्षात अमलांत आणल्या आहेत.
महिलांना सर्व क्षेत्रात 33 टक्के आरक्षण, महिलांना धुराचा त्रास होऊ नये यासाठी मोफत उज्वला गॅस योजना, महिलांनी सक्षम व्हावे यासाठी बचत गट व व्यावसायीकांना सहज कर्ज उपलब्ध करूण देणे. निम्या दरात एस.टी प्रवास आदी मुळे मा. नरेंद्रजी मोदी महिला वर्गात लोकप्रिय असल्यामुळे “अबकी बार ४०० पार” होणारच असल्याचे प्रतीपादन धुळे महिला मोर्चा अध्यक्ष सौ. वैशाली शिरसाठ यांनी केले.
या प्रसंगी व्यासपिठावर जयश्री अहिरराव, कल्याणी अंपळकर, प्रतीभाताई चौधरी, सरचिटणीस यशवंत येवलेकर, भाजयुमोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, छाया पाटील, नेहा अहिरराव, मंडल प्रमुख सुबोध पाटील, करण लोंटे, प्रथमेश गांधी, सुनिल कोठावदे, युवराज हटकर, अजय सोनार, युवराज बोरसे, सुरेखा ठाकरे, वंदना सातपुते, कल्पेश थोरात, निरज देसले, महेंद्र भामरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.