नवी दिल्ली : योग दिनानिमित्त काँग्रेसने ट्विट करत योगा लोकप्रिय केल्याबद्दल आणि राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवल्याबद्दल माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंचे आभार मानले आहेत. मात्र, काही वेळातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी काँग्रेसच्या ट्विटला रिट्विट करत योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून दिल्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक केले. शशी थरूर म्हणाले की, आपल्याला आपले सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रयत्नही लक्षात ठेवले पाहिजेत. शशी थरूर यांनी याआधीही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे अनेकवेळा कौतुक केले आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, नक्कीच! ज्यांनी योगा लोकप्रिय केला आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचे आपण स्मरण केले पाहिजे. आपले सरकार, झचज आणि परराष्ट्र मंत्रालयानेदेखील संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून योगाचे आंतरराष्ट्रीयीकरण करून आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता मिळवून दिली आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे, योग हा जगभरातील आपल्या सॉफ्ट पॉवरचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो ओळखला जात आहे, हे पाहून खूप आनंद झाला.
Indeed! We should also acknowledge all those who revived & popularised yoga, including our government, @PMOIndia & @MEAIndia, for internationalising #InternationalYogaDay through the @UN. As I have argued for decades, yoga is a vital part of our soft power across the world &… https://t.co/WYZvcecl0Q
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) June 21, 2023