मुंबई । आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील भाजपने काँग्रेसला एकामागोमाग झटके दिले. यामुळे भाजपची ताकद वाढवली. अशातच काँग्रेसनंतर भाजप आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, भाजपकडून या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला जात असून राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार अशा चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. इतकंच नाही, तर मंत्रिमंडळात या नेत्याला महत्त्वाचे खाते देखील मिळणार, अशा बातम्या मध्यंतरी होत्या, पण त्या नेत्याने त्याबाबत इन्कार केला.
आता बडा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या नेत्याला दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. तसेच त्यांचं सहकार क्षेत्रातही मोठं नाव आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणारा तो नेता कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.